भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

हॉटेलमागील परिसरात संशयास्पद हालचालींवर एलसीबीची कारवाई ; १३ पुरुष व १० महिलांविरुद्ध गुन्हा, मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली गावाजवळ, बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील काही हॉटेलांच्या मागील परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून १३ पुरुष आणि १०  महिलांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी संबंधितांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ११०  व ११७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारवाईतील महिला राजस्थान राज्यातील असल्याचे समोर आले असून, त्यांची ओळख आणि इतर बाबींची पडताळणी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्यावर मानवी तस्करी, जबरदस्ती, कुंटणखाना चालविणे किंवा वेश्या व्यवसायासाठी शोषण यासंदर्भातील ठोस पुरावे समोर आलेले नसल्याने संबंधित विशेष कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ११० अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील, असभ्य किंवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणाऱ्या वर्तनावर कारवाईची तरतूद आहे. तर कलम ११७  मध्ये अशा उल्लंघनासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!