भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिकसामाजिक

मातोश्री फाऊंडेशनच्या दशवर्षपूर्ती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशिक्षणाचे आयोजन

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज | मातोश्री फाऊंडेशन, पिंपरुड यांच्या दशवर्षपूर्तीनिमित्त तसेच महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त शिक्षण विभागाच्या सहकार्याने वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत इयत्ता पाचवीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कागदापासून पर्यावरणपूरक, कमी खर्चातील व टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांची नावे 3 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच त्याच दिवशी सायंकाळी 3 ते 5 या वेळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांची नावे व गुणपत्रिकेची छायाप्रत 3 ऑगस्ट 2026 पर्यंत शाळा किंवा महाविद्यालयाच्या लेटरहेडवर पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे स्थळ मातोश्री फाऊंडेशन, गट क्र. 439, पिंपरुड फाटा, फैजपूर रोड, पिंपरुड, ता. यावल, जि. जळगाव येथे आहे.

विद्यार्थ्यांची माहिती जनार्दन जंगले (9892057818), चंद्रकांत जंगले (9168548443), व्ही. ओ. चौधरी (9421515976), संजय सराफ (9823137696), सलीम तडवी (9763116785) किंवा तुषार वाणी (9860890560) यापैकी कोणत्याही एका मोबाईल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच इतर उपक्रमांचे नियोजन लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!