नायगाव येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
नायगाव, ता. मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज. विठ्ठल कोळी || राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती नायगाव येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित ग्रामपंचायत प्रशासक श्री शिवदास राठोड साहेब यांचे हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि शांततेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. या वेळी श्री विठ्ठल कोळी व ग्रामसेवक रवींद्र मोरे तसेच सौ आशा ताई पोहेकर यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.
तसेच परिसरात स्वच्छतेचा राबवण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


