भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

वरणगावजवळ मोठा अपघात : भरधाव कारने दुचाकीला उडविले, चौघांच्या मृत्यू

वरणगाव,ता.भुसावळ, मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून एक मोठी धक्कादायक घटना समोर आली.भरधाव कारने दुचाकीवरून चाललेल्या चौघांना उडविल्याची घटना घडली असून या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे चौघे वरणगावच्या कपिलनगर भागातील रहिवाशी होते.

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास वरणगाव शहरा जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. यात भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना एमएच १९ ईव्ही ५३५३ क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात या बाईकवरील चौघे गंभीर जखमी झाले. यात वरणगावच्या कपिलनगर भागातील जय शंकर काळे या दुचाकीस्वारासह ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय-३०) आणि विघ्नेश शंकर चव्हाण (वय-१४) व मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय-१) या चौघांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरनी चौघांना मृत घोषीत केले.या घटनेमुळे वरणगावच्या कपिलनगर भागावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!