भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

दुचाकी इलेक्ट्रिक पोलवर आदळल्याने न्हावी च्या दुचाकी स्वाराचा मृत्यू, पत्नी जखमी

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पती पत्नी दुचाकीवरून सोबत जात असताना आमोदा गावाजवळ बस स्थानकाजवळ दुचाकीस्वार पतीला अचानक भोवळ आल्याने वाहन इलेक्ट्रीक पोलवर आदळून झालेल्या अपघातात न्हावी येथील दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाला. ही घटना दिनाक ४ जून रोजी दुपारी दिड वाजता घडली .

भगवान वावधन चोपडे. वय ५४ वर्षे, रा . न्हावी, ता.यावल हे पत्नी सह ४ जून रोजी दुपारी दुचाकीवरून जात असताना त्यांना आमोदा गावाच्या बस स्थानकाजवळ दुचाकीवर भोवळ आली व पत्नीने दुचाकी थांबवण्यास सांगूनही त्यांनी दुचाकी चालवल्याने ही दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळली व या अपघातात चोपडे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली. रमेश टिकाराम चोपडे (49, न्हावी, ता.यावल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!