भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, ९ पोलिस अधिकारी निलंबित, पोलिस वर्तुळात खळबळ

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखबल्याबद्दल आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत एकूण ४ पोलिस अधिकारी आणि ४ पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना पोलिसांचा निष्काळजीपणा आणि वरिष्ठ पातळीवरील पर्यवेक्षणाच्या अभावामुळे घडल्याचे समोर आले आहे. विषारी दारूच्या या गंभीर प्रकरणाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा कमालीची मलिन झाली. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भुमिकेवर गंभीर प्रशचिन्ह उपस्थित केले जात होते. पोलिस दलाची जनमानसातील विक्षासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणान्यांना कडक संदेश देण्यासाठी दोन्ही पोलिस आयुक्तांनी ही निलंबनाची कायदेशीर कारवाई केल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हडपसर पोलिस ठाण्यातील ३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई…
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर त्यांनी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे…

१) संजय मोगले (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर)
२) हसिना शिकलगार (सहाय्यक पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस चौकी, पुणे शहर)
३) हसन मुलाणी
(पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक, हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर)
या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दद्दीत अवैध त विषारी दारूची विक्री सुरू असत्ताना त्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी पोलिस चौकीतील ६ जण निलंबित…
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही दापोडी पोलिस चौकीशी संबंधित २ अधिकारी आणि ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे…

१) विजय वाघमारे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दापोडी पोलिस ठाणे)
२) राजू भास्कर (फौजदार तथा तपास पथक प्रमुख)
३) जयदीप सोनवणे (पोलिस कर्मचारी)
४) नवनाथ पोटे (पोलिस कर्मचारी)
५) सागर जाधव (पोलिस कर्मचारी)
६) विशाल काळे (पोलिस कर्मचारी)

फुगेवाडी व हडपसर भागात विषारी दारूमुळे १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बेकायदा आणि संशयित बनावट मद्याचा पुरवठा रोखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील २२ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!