भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

फैजपूर येथील दत्त डेअरी वर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई, परिसरात खळबळ

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज | तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्या पासून राज्यात भेसळ करणाऱ्या व भेसळ युक्त पदार्थ विक्रेते, व्यापारी मानी मोठा धसका घेतला असून कारवाईच्या धाकाने अनेक पदार्थ बाजारातून गायब झाले असल्याचे दिसून येत आहे. अशातच यावल तालुक्यात सुद्धा अन्न व औषध प्रशासनाने धडक देत मोठी कारवाई केली.

ऐतिहासिक फैजपूर शहरातील हनुमान मंदिर परिसरातील दत्त डेअरीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक धडक देत तपासणी मोहीम राबवत डेअरीत दुधापासून तयार केलेल्या विविध पदार्थांचे नमुने घेऊन तपासणी साठी
सिलबंद करून ताब्यात घेतले. या अचानक झालेल्या कारवाई मुळे फैजपूर शहरात दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या व विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अन्न औषध प्रशासना कडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत असून ही कारवाई पथकाने तब्बल पाच तास डेअरीची तपासणी केली. दत्त डेअरीतील तपासणी दरम्यान दूध, दही, पनीर, तूप व क्रीम यांचे नमुने घेऊन ते सीलबंद करण्यात आले. संबंधित नमुने शासकीय प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच उत्पादनांमध्ये भेसळ आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार होणार आहे. ..

तपासणीत अहवालात भेसळ आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार फौजदारी कारवाई, तसेच आवश्यकते नुसार परवाना रद्द करण्याबाबतही शिफारस केली जाऊ शकते. तपासणी दरम्यान डेअरीतील स्वच्छता, गुणवत्ते बाबत दूध साठवणूक पद्धती तसेच विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पदार्थांची पाहणी करण्यात आली. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निश्चित निकषांचे पालन होत आहे की नाही, याचीही खात्री करण्यात आली.

राज्यात अन्न व औषध प्रशासना मोठ्या कारवाया सुरू असून  राज्यभर भेसळ विरोधी मोहिम राबविली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यावल तालुक्यात अनेक ठिकाणी देवी देवतांचे नावे देऊन दुग्धजन्य व इतर खाद्यपदार्थ विक्रीचे गोरख धंदे सर्रासपणे सुरू आहे. काही दूध संकलन करणाऱ्या व्यवसायिकांनी तर गावागावात प्रसिद्धी करून आपले उद्योग धंदे शहरात ठीक ठिकाणी सर्रासपणे सुरू करून अनेक दुग्धजन्य पदार्थ विक्री करीत आहे. ठिकठिकाणी असलेल्या दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात दूध संकलन नेमके कुठून आणि कोणत्या माध्यमातून केले जाते याबाबतची चौकशी झाल्यास भेसळीचे उद्योग समोर येणार.
तालुक्यात अनेक ठिकाणी बिना परवाना थंड पेय पॅकिंग करून अवैधरित्या ठिकठिकाणी विक्री होत आहे.अन्न व औषध प्रशासन थेट कारवाई करणार की कारवाईच्या नावा खाली तडजोड करणार या कडे जनतेचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!