भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

स्थानिक गुन्हे शाखेची भुसावळ मध्ये मोठी कारवाई, १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातुन परराज्यातील ३ आरोपी जेरबंद

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनांक ०१/०६/२०२६ रोजी फिर्यादी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात येवुन फिर्याद दिली की, दिनांक ३१ मे २०२६ रोजी ते कामानिमीत्त बाहेर गेले असुन त्यांचे घर बंद होते त्यांचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याने त्यांनी अज्ञात चोरटया विरुध्द तक्रार दिल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्र. २८६/२०२६ भा. न्या. संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हाचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, श्री श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड यांना सदर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकामी मार्गदर्शनपर सुचना दिल्या त्यानुषंगाने श्री राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेग-वेगळे पथक तयार करुन त्यांना सदर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना देवुन आदेशित केले.

तयार करण्यात आलेल्या पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) राजू जसपालसिंग, वय ४२ वर्षे, रा. हरियाणा, २) भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान, वय ४० वर्षे, रा. बिहार आणि ३) राजेश पारस शहा, वय ५२ वर्षे, रा. बिहार असे सर्व नागपूर शहरात असल्याची खात्रीदायक माहिती मिळाल्याने, तात्काळ नागपुर नागपूर पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्हयांतील चोरीस गेलेले एकूण १६,३४,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हांचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक श्री. केदार बारबोले उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उप निरीक्षक/शरद बागल, पोहेकॉ/गोपाळ गव्हाणे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना/विकास सातदिवे पोकों/प्रशांत परदेशी पोकों/राहुल वानखेडे या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!