भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मोबाईल टॉवर जनरेटर मधील डिझेल चोरी प्रकरणी एकाला अटक

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ. दीपक लोखंडे | मोबाईल टॉवरच्या जनरेटर मधील डिझेल चोरी करणाऱ्या आरोपीला नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अंदाजे 15 हजार 934 रुपयांच्या 170 लिटर डिझेलची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी विजय नागराज पाटील (सुपरवायझर, रा. आशाबाबा नगर, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तरसोद गावातील आसोदा रोडवरील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून अज्ञात चोरट्यांनी डिझेल चोरून नेले होते.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी केदार वायचळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नाखेडे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी श्याम सुभाष कुकडे (वय 38, रा. राणेगाव तांडा, ता. तेल्हारा, जि. अकोला, सध्या रा. पिंपळा, जळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर 19 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली.

आरोपीकडून चोरी केलेले डिझेल विक्रीतून मिळालेले सुमारे 15 हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी राजेश मेंढे करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या कॉलनी व घरांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!