भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल च्या दरात पुन्हा वाढ, दहा दिवसात तिसरी दरवाढ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, गेल्या १० दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे. इराण युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आता थेट इंधन दरांवर दिसू लागला आहे.

नवीन दरांनुसार, पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर ८७ पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर पेट्रोलचा दर १०७.८७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ९४.३९ रुपये प्रति लिटर झाला आहे.

गेल्या १० दिवसांत तिसरी दरवाढ
गेल्या दोन आठवड्यांत इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वप्रथम १५ मे रोजी प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा ९० पैशांची वाढ झाली. आता झालेल्या ताज्या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये जवळपास ५ रुपयांची वाढ झाली आहे. डीलर्सच्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर आता ९९.५१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ९२. ४९रुपये प्रति लिटर झाला आहे.

इराण युद्धाचा परिणाम?
जागतिक स्तरावर इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर आर्थिक दबाव वाढत आहे. वाढलेल्या आयात खर्चामुळे सरकारवरही ताण निर्माण झाला असून, काही तोटा भरून काढण्यासाठी इंधन दरवाढीचा पर्याय निवडला जात असल्याचे मानले जात आहे.

आणखी महागाई वाढणार? डॉलरच्या तुलनेत रुपया 150 पर्यंत घसरणार? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महागाई आणखी वाढणार?
पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दैनंदिन वस्तू आणि इतर आवश्यक सेवांच्या किमतींवरही होऊ शकतो. त्यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!