Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावनशिराबाद

जळगाव जिल्ह्यात अवैधधंद्यां विरोधात पोलिसांची विशेष मोहीम, हातभट्टी व गावठी दारू विरोधात ६२ गुन्हे

२४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १७७ पान टपऱ्यां व १२३ भंगार दुकानांची तपासणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | (दि. १० ऑगस्ट) जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवत अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई केली.

हातभट्टी व गावठी दारूविरोधात ६२ गुन्हे
हातभट्टी व गावठी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यात प्रभावी कारवाई करण्यात आली. विशेष मोहिमेदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये ६२ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २२ हजार ०२३ लिटर गावठी दारू, रसायने तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, असा एकूण २४ लाख १३ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१७७ पान टपऱ्यांवर COPTA Act अंतर्गत कारवाई
जिल्ह्यातील पान टपऱ्यांवरही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. एकूण १७७ पान टपऱ्यांवर COPTA Act प्रमाणे कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३२ पान टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

१२३ भंगार दुकानांची विशेष तपासणी
जिल्ह्यातील भंगार दुकानांची विशेष तपासणी करण्यात आली. मोहिमेदरम्यान एकूण १२३ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ७ भंगार दुकानांमध्ये मालाबाबतची माहिती संशयास्पद आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी व गावठी दारू निर्मिती-विक्री, पान टपऱ्यांवरील कायद्याचे उल्लंघन तसेच चोरीच्या मालाचा खरेदी-विक्रीसाठी वापर करणाऱ्या भंगार दुकानांची तपासणी यापुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोठेही अशा प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी निर्भयपणे जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

या विशेष मोहिमेतील कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गवित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर तसेच चाळीसगाव येथील अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व इतर संबंधित अधिकारी-अंमलदार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!