Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

अंजाळे हायस्कूल येथे हरित महाराष्ट्र मोहिमेंतर्गत वृक्षारोपण संपन्न

अंजाळे. ता. यावल.मंडे टु मंडे न्युज | (१० ऑक्टोबर २०२६ ) रोजी हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन श्री. मदनभाऊ सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. नलिनीताई यशवंत सपकाळे (सरपंच, अंजाळे) यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमात वरिष्ठ शिक्षक श्री. लिलाधर वानखेडे यांनी वृक्षांचे पर्यावरणातील तसेच मानवी जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारे घटक नसून, भावी पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित जीवनाचा आधार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी श्रीमती ज्योती परखड, श्री. मनोज चौधरी, श्री. सुनील सोनवणे आणि श्री. यश चौधरी यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात हरित व सुंदर वातावरण निर्माण करण्यास हातभार लागला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!