भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

चांगदेव मत्स्योद्योग सोसायटीच्या चेअरमन पदी एस.ए भोई यांची आठव्यांदा बिनविरोध निवड

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका चांगदेव मत्स्योद्योग सहकारी सोसायटी लिमिटेड मर्यादित हरताळा या संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन ची निवडणूक प्रक्रिया दिनांक 18 रोज बुधवारी अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पार पडली. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड पाच वर्षासाठी करण्यात आली.

अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात एस ए भोई यांची मुक्ताईनगर तालुका चांगदेव मत्स्योद्योग सहकारी सोसायटी लिमिटेड मर्यादित हरताळा या संस्थेच्या चेअरमन पदी आठव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली तसेच संस्थेची संचालक ज्ञानेश्वर भोई यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे 11 संचालक व 2 संचालिका असे एकूण 13 संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डि. आर. काबरा जळगाव लेखा परीक्षक व संस्थेचे सचिव गणेश न्हावकर यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले. यावेळी संचालक सोपान भोई, शेख शरीफ शेख हमिद, रमेश भाई, ज्ञानेश्वर भोई, रघुनाथ भोई, सुलभा राजेंद्र भोई, वसंताबाई हिरामण भोई, पांडुरंग कोळी, शिवा भोई, अभिमान भोई, रवींद्र परदेशी व सुरेश भोई उपस्थित होते. त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!