महिलांचा अवमान करणाऱ्या विकृती विरोधात मुक्ताईनगर मध्ये जनआक्रोश; सर्वपक्षीय व सर्व समाजाचा भव्य निषेध मोर्चा!
तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिलेले निवेदन स्वीकारले; आरोपी विजय चौधरीवर कडक कारवाईची मागणी
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके ||ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, राज्याच्या मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ, अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी याच्या विकृत मनोवृत्तीविरोधात आज मुक्ताईनगर येथे सर्वपक्षीय व सर्वसमाज बांधवांच्या वतीने भव्य जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला.
‘महिलांचा सन्मान हाच आपला स्वाभिमान’ आणि ‘विकृत प्रवृत्तीचा तीव्र निषेध’ अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण मुक्ताईनगर परिसर दुमदुमून गेला होता. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्ष, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोर्चात महिला भगिनी, युवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली.
प्रशासनाला दिलेले औपचारिक निवेदन आणि मागण्या:
तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने मा. तहसीलदार आणि मा. पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांना प्रत्यक्ष भेटून संयुक्त निवेदनाची प्रत सुपूर्द करण्यात आली व त्याची रीतसर पोच घेण्यात आली. निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
१. बिगरजामीनपात्र गुन्हा: संशयित आरोपी विजय चौधरी याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
२. तात्काळ अटक: सदर आरोपीला विनाविलंब अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावा.
३. कठोर शासन: सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा विचार करता प्रशासनाने अशा विकृतीविरुद्ध उदाहरणास्पद कारवाई करावी.
निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर प्रशासनाने यावर तात्काळ कडक कारवाई केली नाही, तर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महिला भगिनी व समाज बांधवांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने जनआक्रोश आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल, ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.
सर्वपक्षीय वज्रमूठ!
या जनआक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकवटले होते.
प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
या भव्य निषेध मोर्चात भैयासाहेब रवींद्र पाटील, प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष), एस. ए. भोईसर, डॉ. जगदीश पाटील, निवृत्तीभाऊ पाटील, अनिलभाऊ पाटील, दशरथभाऊ कांडेलकर, ईश्वर रहाणे, प्रविण कांडेलकर, राजू माळी, योगेश कोलते सर, विलास धायडे, डॉ. बी. सी. महाजन, शिवा पाटील, ललित महाजन, ॲड. राहुल पाटील, मनोज तळेले, लक्ष्मण सापधारे, दीपक पाटील (शिवसेना उबाठा), पंकज कोळी, बापू ससाणे, डी. के. पाटील (काँग्रेस), लताताई सावकारे, तृप्तीताई तुषार राणे, सुनीताताई भालेराव, मनीषाताई जावरे, अरुणा पवार, सुधाकर बोदडे (RPI), बुलेस्टीनी भोसले, आबा पाटील, सागर पाटील (काँग्रेस), ज्ञानेश्वर पाटील, निलेश भालेराव, रामभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, मुन्ना बोंडे, भागवतभाऊ पाटील, माणिकराव पाटील, रामदास पाटील, सतिश पाटील,
बाळू पाटील, नाना नेरकर, विनोद मायकर, सुनील सपकाळ, निलेश पाटील, अतुल पाटील, अंकुश चौधरी, विकास पाटील, सुनील पाटील, राजू शिरतुरे, नंदकिशोर हिरोळे, सुभाष खाटीक, त्याच प्रमाणे वासुदेव बढे, आर. पी. पाटील, प्रभाकर झोपे, पुरुषोत्तम महाजन, अनिल वराडे, गणेश पाटील, किशोर गायकवाड, संदीप जावळे, बाळा चिंचोले, शिवाजी वानखेडे, सुनील कोळी, लक्ष्मण भालेराव, एजाज खान, जाविद खान, मुस्ताक मण्यार, सलीम शेख, इरफान खान, वसीम खान, अतीक खान, दीपक साळुंखे, मनोज जाधव, अतुल पाटील, कैलास वंजारी, योगेश पाटील, प्रवीण पाटील, प्रभाकर झोपे, उमेश राणे, साहेबराव पाटील, विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, पंकज सरोदे, भागवत चोपडे, निलेश खोसे, राजेंद्र धुंदे, विजय यमनेरे, उत्तम दगडे, महेंद्र जगताप, रुपेश पाटील, राजेश चौधरी, विनोद काटे, कैलास दुट्टे, सुनील पाटील, विलाससिंह पाटील, संजय कपले, दीपक वाणी, गणेश शेळके, किरण वंजारी, माणिकराव पाटील, प्रमोद पाटील, धनंजय एदलाबादकर, दीपक पाटील, रवींद्र दांडगे, सतीश पाटील, राहुल चौधरी, ॲड. पवन पाटील, प्रवीण दामोदर, चेतन राजपूत, प्रदीप बडगुजर, विजय भोई, आकाश भोई, यांच्यासह तालुक्यातील असंख्य राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


