भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा पोलीस स्टेशनला सामाजिक बांधिलकीतून पंजाब नॅशनल बँकेकडून २१ बॅरिकेड्स मदत सुपूर्द

सावदा.ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) वतीने सामाजिक बांधिलकी (CSR फंड) उपक्रमांतर्गत सावदा पोलीस स्टेशनला ८३,००० रुपये किमतीचे २१ बॅरिकेड्स भेट देण्यात आले आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रण चोख ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी, या उद्देशाने बँकेने ही मदत केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे नाशिक सर्कल हेड श्रीमती नित्याकल्याणी, डेप्युटी सर्कल हेड श्री. अशोक आहुजा, चीफ मॅनेजर (मार्केटिंग, नाशिक) श्री. डी. श्रीनिवास आणि सावदा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. रवी आव्हाड यांचे प्रयत्नाने सदरची मदत मिळाली आहे.

बँकेने दाखवलेल्या या सामाजिक जबाबदारीबद्दल सावदा पोलीस प्रशासनाच्या वतीने पंजाब नॅशनल बँकेचे मनापासून आभार मानण्यात आले. हे बॅरिकेड्स शहरातील विविध अंतर्गत नाके आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक शिस्त लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!