भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

आज पण कुंभारखेडा सह परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस – राहिलेली पिकेही जमीनदोस्त, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

कुंभारखेडा.ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रा योगेश कोष्टी | आज दिनांक ७ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभारखेडा सह चिनावल परिसरातील जे काही राहिलेली पिके होती ती सुद्धा जमीनदोस्त झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाल्याचा दिसून येत आहे. सुलतानी संकटासोबत आता अस्मानी संकटाचा सामना परिसरातील बळीराजाला करावा लागत असून परिसरातील शेतकरी वर्ग पुरता संकटात सापडला आहे.तासाभराच्या वर चाललेल्या या पावसामुळे कुंभारखेडा येथील नाल्यास नदीचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे आणि ते ओसंडून वाहू लागल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात खोळंबा निर्माण झाला.


याबाबत सविस्तर वृत्त असे की , आज तिसऱ्या दिवशी सुद्धा दि.७ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास अत्यंत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे परिसरातील नव्याने पेरणी केलेल्या पिकांसह केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून बागायत दाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे परिसरातील केळी बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून गेला आहे. गेल्या २ दिवसापासून सतत चालू असलेल्या या वादळी थैमानामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पुरता हवालदिल झाला आहे. मोठ्या प्रमाणात चिनावल कुंभारखेडा मार्गावर झाडे पडल्यामुळे काही काळ रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता.

गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसाच्या या संकटामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत खांबांची पडझड, तारा तुटणे यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यावर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर परिसरातील विजपुरवठा सुरळीत सुरू केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!