भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाचे तुकाराम मुंढे यांचा आता मेडिकल दुकानांकडे मोर्चा, “फार्मासिस्ट नसलेल्या” मेडिकल दुकाने सील कराच. चालकही धास्तावले!

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पदभार स्वीकारल्या पासून आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासनात नियुक्ती होताच औषध दुकानांच्या चालकांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे. आता औषध निरीक्षकच सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती या दुकान चालकांना करीत आहेत. त्यामध्ये डॅाक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) आणि फार्मासिस्ट उपस्थित असणे यावर भर देण्यात आला आहे. फार्मासिस्ट नसलेल्या मेडिकल दुकाने सील करण्याचे आदेशच त्यांनी देऊन टाकले आहेत.

२१ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २५ वेळा बदली
प्रशासकीय सेवेतील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची सर्वात शेवटी १९ मे २०२६ रोजी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या आयुक्तपदी बदली करण्यात आली . यानंतर त्यांनी २५ मे २०२६ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीतील ही तब्बल २५ वी बदली आहे. त्यापूर्वी केवळ दीड महिन्यांपूर्वीच (एप्रिलमध्ये) त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली झाली होती, त्यानंतर अवघ्या ४५ दिवसांत त्यांची पुन्हा बदली करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोर आणि साठेबाजांना सळो की पळो करुन सोडणारे डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांची वक्रदृष्टी आता वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळवली. बाजारपेठेत मिळणाऱ्या वडापाव आणि समोसा व अन्य खाद्य पदार्थांसाठी ग्राहकांना बांधून देण्यासाठी सर्रासपणे वर्तमानपत्रांच्या कागदाचा वापर होतो. मात्र, यापुढे वडापाव, समोसा आणि तत्सम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदात गुंडाळून विकता येणार नाही, असा आदेश अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने दिला आहे. यात कुठलीही सेटलमेंट नाही. असा इशाराच देऊन टाकला आहे. त्यांनी त्यांचा मोर्चा आता मेडिकल दुकानांकडे वळविला आहे.

फार्मासिस्ट नावापुरताच

औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत, राज्यातील औषध दुकानांवर नियंत्रण ठेवले जाते. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून वैध, स्वाक्षरी केलेले प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतरच ठराविक औषधे हे दुकान चालक देऊ शकतात. परंतु बऱ्याचवेळा त्यात हयगय केली जाते. प्रामुख्याने कफ सिरप वा विशिष्ट प्रतिजैवके, शामक औषधांचा समावेश आहे. याशिवाय काही औषधे ही रेफ्रिजेटरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. बऱ्याचवेळा या औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नावापुरता असतो. आता मात्र याबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच दिला आहे. आयुक्त कधी कुठे छापा टाकतील याचा नेम नाही,

मानसिक आजारावरील औषधे जसे त्यात अनुसूची एच आणि एच वन यामध्ये प्रतिजैविके, शामक औषधे आणि अधिक प्रभावी औषधांचा समावेश होतो.औषधविक्रेत्यांनी अनुसूची एच वनमधील औषधांची प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि काटेकोर नोंद ठेवणे बंधनकारक आहे. अनुसूची एक्समध्ये अत्यंत नियंत्रित पदार्थ आणि मादक द्रव्यांचा समावेश होतो. औषधविक्रेत्यांनी औषधचिठ्ठीची छापील प्रत दोन वर्षांसाठी दप्तरी जतन करून ठेवली पाहिजे, असेही बंधनकारक आहे.

गंभीर गुन्हा
वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिबंधित औषधांचा विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. शिक्षेमध्ये मोठ्या रकमेच्या दंडापासून ते औषध परवाना रद्द होणे वा तुरुंगवास होऊ शकतो. किमान एक ते तीन वर्षांपर्यंत वा औषध मादक किंवा मनोविकारी पदार्थ असेल तर तुरुंगवास आणखी वाढू शकतो. याशिवाय किमान दंड पाच हजार रुपयांपासून सुरु होतो. औषध दुकानाचा परवाना तात्पुरता निलंबित किंवा कायमचा रद्द करू शकतात.
तसेच नोंदणीकृत फार्मासिस्ट औषध दुकानात प्रत्यक्ष उपस्थित नसल्यास औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यान्वये तुरुंगवास ३-६ महिन्यांपर्यंत किंवा दंड दोन लाखांपर्यंत तसेच परवाना रद्द करणे आणि दुकान तात्काळ सील करणे आदी तरतुदींचा समावेश आहे.सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासनात आयुक्त म्हणून नियुक्ती होताच औषध दुकानांच्या चालकांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!