रावेर

सावदा येथील युवकाचा गारबर्डी धरणात बुडून मृत्यू

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl सावदा येथील ख्वाजा नगर भागातील इयत्ता दहावीत शिकत असलेला पंधरा वर्षीय युवक शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा मित्रांसह गारबर्डी धरणावर फिरायला गेला असता धरणात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रमजान ईदच्या दिवशी घडली.

ताबिश शेख याने रमजान महिन्याचे   ३० रोजे पूर्ण केले होते त्याला ” हाफिज जे कुराण”  ही पदवी देण्यात आली होती. काल दि. ११ एप्रिल गुरुवार रोजी रमजान ईद चा उत्साह होता, सकाळी ईदगाह वर सामूहिक नमाज पठण केल्यानंतर तो आपल्या चार पाच मित्रांसोबत गारबर्डी धरणावर फिरायला गेला होता. तेथे धरणात त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडल्याने त्याच्या परिवारासह ख्वाजा नगर
परिसरात शोककडा पसरली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!