महाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षणमंडळ घेणार निर्णय, इयत्ता ६ वी,९ वी व ११ वी या इयत्ते साठी नवी शिक्षण पद्धत

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २०२४ – २५ या शैक्षणिक सत्रापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) प्रायोगिक तत्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावी साठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मागील वर्षी सरकारने माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), २०२० अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.

शाळेच्या शिक्षकांना CBSE ने लिहलेल्या एका पत्रात म्हटलं आहे की, CBSEने NCRFच्या सूचनेनुसार एक मसूदा जारी केला आहे. त्यावर अनेक कार्यशाळांसोबच चर्चा केल्यानंतर आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मंजूरीदेखील मिळवली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांची प्रायोगिक अंमलबजावणी त्यांच्या परिणामकारकतेची चाचणी आणि मूल्यांकन करण्यासाठी केली जाईल. सीबीएसई संलग्न शाळांमध्ये सत्र २०२४-२५ साठी इयत्ता ६ वी, ९ वी आणि ११ वी या इयत्तांमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क राबविण्याची योजना आहे.सीबीएसईने पुढे पत्रात नमूद केले आहे की, प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या या कार्यक्रमासाठी इच्छुक असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक याबाबत माहिती देऊ शकतात. विद्यार्थी वर्गातील वाचन, प्रयोगशाळेतील काम, प्रकल्प, खेळ, परफॉर्मिंग आर्ट्स, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), सामाजिक कार्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रायोगिक शिक्षण, ज्यामध्ये संबंधित अनुभव आणि व्यावसायिक स्तराचा समावेश आहे, यातून ‘क्रेडिट’ मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी कमावलेले ‘क्रेडिट’ त्यांच्या ‘Academic Bank of Credit’ (ABC) मध्ये जमा केले जाईल.

‘राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क’ म्हणजे काय?
विद्यार्थ्याला मिळणारे क्रेडिट्स ‘Academic Bank of Creditमध्ये जोडले जातील. विद्यार्थ्याला इयत्ता नववीसाठी कमावलेल्या क्रेडिटनुसार पाच विषय उत्तीर्ण करावे लागतील. त्यात दोन भाषा आणि तीन इतर विषयांचा समावेश आहे. उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळू शकेल. प्रत्येक विषयासाठी २१० तास असतील. तर, अशा एकूण पाच विषयांसाठी १०५० तास देण्यात येतील. १५० तास अंतर्गंत मुल्यांकन, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण आणि कार्यानुभवासाठी असतील. विद्यार्थाला प्रत्येक विषयासाठी 7 क्रेडिट्स असणार आहेत. विद्यार्थ्याला इयत्ता ९ वीत पाच विषय उत्तीर्ण झाल्यानंतर ४० क्रेडिट मिळतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!