क्राईमरावेर

मोठी बातमी ; रावेर तालुक्यात ९१ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यात एका शेतात गांजाची लागवळ केलेली आढळल्याने पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९१ किलो ४०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून त्या गांजाची एकूण ६,२१,५२०/- रुपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रावेर तालुक्यातील सातपुडा भागात असलेल्या लालमती ते सहस्रलिंग शेतशिवरातील परिसरात रोड लागत असलेल्या शेतात गांज्याच्या झाडाची लागवड करुन त्याची जोपासणी
करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी या बाबत शेतात चौकशी केली असता त्यांना अक्रम कासम तडवी व शहारुख कासम तडवी दोन्ही रा. सहस्त्रलींग ता. रावेर यांच्या मालकिच्या शेतात राज्यात प्रतिबंध असलेल्या गांजाची झाडे आढळून आले. या कारवाईत एकूण ९१ किलो ४०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून त्या गांजाची एकूण ६,२१,५२०/- रुपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बाबत रावेर पोलिसस्टेशनला गुंगीकारक औषधीद्रव्ये आणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (ब), २० (क) प्रमाणे आरोपी नामे (१) अक्रम कासम तडवी (२ ) शहारुख कासम तडवी दोन्ही रा. सहस्त्रलींग ता. रावेर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यापैकि आरोपी शहारुख कासम तडवी यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई दि. १० एप्रिल बुधवार रोजी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक जळगांव डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक नखाते अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपुर्णा सिंह सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि आशिष अडसुळ, पोउपनिरीक्षक सचिन नवले ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील ,कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, सचिन रघुनाथ घुगे, विशाल शिवाजी पाटील, प्रमोद सुभाष पाटील, महेश मंगलदास मोगरे, समाधान कौतीक ठाकुर, संभाजी ,रघुनाथ बिजागरे यांच्या पथका सह तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंच,फोटो ग्राफर , वजन काटा मालक यांचे संयुक्त पथकाने कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!