भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर तालुक्यात कोतवाल पदांची आरक्षण सोडत संपन्न, ९ सजांचे आरक्षण जाहीर

भोर. ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज.विकास धनगर ||
रावेर तालुक्यातील रिक्त कोतवाल पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आरक्षण सोडत नुकतीच शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार संजय तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (Non-PESA) आठ सजे आणि अनुसूचित क्षेत्रातील (PESA) पिंप्री या सजेसह एकूण ९ कोतवाल पदांचे आरक्षण समितीसमोर निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.

सजानिहाय आरक्षण

  • थेरोळे – अनुसूचित जाती (महिला)
  • कोचूर बु. – अनुसूचित जाती
  • अजंदे – भटक्या जमाती-ब (VJNT-B)
  • रावेर – भटक्या जमाती-ड (NT-D)
  • तांदलवाडी – इतर मागास प्रवर्ग (OBC)
  • वाघोदा बु. – इतर मागास प्रवर्ग (महिला)
  • निंभोरा बु. – सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC)
  • रायपूर – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
  • पिंप्री (PESA क्षेत्र) – नियमानुसार आरक्षण

अनुसूचित क्षेत्रातील पिंप्री सजेसाठीचे आरक्षणही शासनाच्या नियमानुसार निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीने कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील नागरिक आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!