सावदा पोलिसांची धडक कारवाई; महिलेकडून ६४६ ग्रॅम गांजा जप्त
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एका महिलेकडून ६४६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी ४९ वर्षीय महिलेविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदा येथील ख्वॉजानगर परिसरात राहणारी मुमताजबी उर्फ नमा शेख सलीम (वय ४९) ही गांजाची विक्री व वाहतूक करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगत असल्याची गोपनीय माहिती सावदा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
राजपत्रित अधिकारी, पंच, फोटोग्राफर व इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह पोलिसांनी शनिवारी रात्री ख्वॉजानगर परिसरात छापा टाकला. सुरुवातीला संशयित संजय सिकंदर तडवी यांच्या घराची झडती घेण्यात आली; मात्र तेथे काहीही आढळले नाही. त्यानंतर मुमताजबी शेख यांच्या घराची झडती घेतली असता लोखंडी कपाटातून गांजासदृश पदार्थ आढळून आला.
जप्त केलेल्या पदार्थाचे वजन ६४६ ग्रॅम भरले. पंचांसमक्ष त्याची मोजणी, छायाचित्रण व नमुना सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार निलेश जगतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून मुमताजबी उर्फ नमा शेख सलीम हिच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम २०(ब)(II)(अ) अन्वये सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई सपोनि गणेश फड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी राहुल सानप, पोहेका/ उमेश पाटील, पोहेका/ निलेश बाविस्कर, पोहेका/ विजय पोहेकर, पोकाँ/ बबन तडवी, पोकाँ/ संजय तडवी, पोकाँ/प्रकाश जोशी, पोकाँ/ मयुर पाटील, पोकाँ/ निजामोद्दीन शेख मपोकाँ/ नेहा बारेला असे असे


