Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसावदा

सावदा पोलीसांची गोवंश मांस विक्री व बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांवर धडक कारवाई; ८५ किलो गोमांसासह आरोपी ताब्यात


सावदा. ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल/२४८६ मेहेरबान तडवी यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीसांनी लोहारा ता. रावेर परिसरात बेकायदेशीररित्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून त्याच्या मांसाची विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

दिनांक २८/०९/२०२६ रोजी सकाळी ६:२९ वाजेच्या सुमारास सावदा पोलीस स्टेशनचे पोउपनि श्री. राहुल सानप, सपोनि श्री. गणेश फड आणि सहकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोहारा ता. रावेर गावच्या गुल्ली लोहारा भागात सुकी नदीच्या काठी असलेल्या एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररित्या गोवंश जनावराचे मांस बाळगून त्याची विक्री केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह सकाळी ६:५५ वाजता घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून घटनास्थळावरून एका आरोपीला रंगेहात पकडले, तर दुसरा आरोपी झाडाझुडपांचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.


आरोपींची नावे:
१. सलीमखा महेमुदखा कुरेशी (रा. रसलपुर ता. रावेर) महेमुदखा कुरेशी, वय- ६६ वर्षे, रा. कसाईवाडा रसलपुर ता. रावेर – (ताब्यात घेतलेला आरोपी)
२. अकीलखा सलिमखा कुरेशी (रा. रसलपुर ता. रावेर – पळून गेलेला आरोपी)
३. असलम शहादुर तडवी (रा. गुल्ली लोहारा ता. रावेर) – (जागा मालक)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत रु. २१,९००/-):

  • ८५ किलो गोवंश जातीचे मांस (अंदाजे किंमत रु. १७,०००/-)
  • एक SUPER QUALITY वजन काटा (किंमत रु. ३,०००/-)
  • एक अखंड लोखंडी सुरा (किंमत रु. ५००/-)
  • एक लोखंडी लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड (किंमत रु. ५००/-)
  • ९००/- रुपये रोख रक्कम (१०० रुपयांच्या ८ नोटा व ५० रुपयांच्या २ नोटा)


याप्रकरणी आरोपींविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात FIR No. 0242/2026 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित २०१५) चे कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ)
  • भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २७१, ३(५)
  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १०५, ११७

घटनास्थळावरून गोमांसाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद करून घेण्यात आले असून पुढील तपास पोहेकॉ अतुल तडवी हे करत आहेत.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, मा ऑफर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मा उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. नि. गणेश फड, पो. उ. नि. राहुल सानप, श्रे पो. उ. नि. जयराम खोडपे, पोहेका मेहरबान तडवी, अतुल तडवी, निलेश बाविस्कर, चालक पोकॉ विकास जोशी अशांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!