भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात “शिष्यवृत्ती मार्गदर्शन” कार्यशाळा संपन्न

ऐनपूर, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्र आणि ग्रंथालय विभागातर्फे “शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे” प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव अध्यक्ष म्हणून लाभले. त्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकारकडून मिळणारे शिष्यवृत्ती आणि विविध खाजगी संस्थांकडून सी. एस . आर. अंतर्गत शिष्यवृत्ती तसेच विद्यापीठातील विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे शिष्यवृत्ती यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.


प्रमुख व्याख्याते महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.एस. एस. साळुंके हे होते त्यांनी शिष्यवृत्तीसाठी लागणारे विविध कागदपत्रांची माहिती दिली तसेच त्यांचे जतन कसे करावे, स्कॅनिंग – फाईलिंग कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागाचे प्रा. प्रदीप तायडे यांनी एल.आय.सी., एच.डी.एफ.सी., एस.डी.सिड., एस.बी.आय.अशा विविध खाजगी संस्थांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती तसेच महाडीबीटी च्या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे आयोजन समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ.‌एस.एस. साळुंखे, डॉ. पी.आर. गवळी, डॉ. रेखा पी. पाटील, डॉ. एन. यू. बारी, प्रा . एच.एम. बाविस्कर, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन,श्रेयस पाटील, सौरभ पाटील, ऋषिकेश महाजन, रोहित चौधरी, अनिकेत पाटील, हर्षल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!