भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

शाळांना यंदा दिवाळीच्या ११ दिवस सुट्ट्या; ५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ब्रेक!२०२६-२७ शैक्षणिक वर्षाचे सुट्टीचे वेळापत्रक ; २३७ दिवस शाळांचे कामकाज

मुंबई.मंडे टु मंडे न्युज | राज्यातील शाळांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात दिवाळीच्या तब्बल ११ दिवसांच्या सुट्ट्या असणार आहेत. ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळांच्या सार्वजनिक सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


या शैक्षणिक वर्षात शाळांचे एकूण २३७ कामकाजाचे दिवस असतील. यामध्ये परीक्षांचे दिवसदेखील समाविष्ट आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या नियमानुसार, परीक्षांचे दिवस वगळता विद्यार्थ्यांना किमान २२० दिवस अध्यापन मिळणे अपेक्षित आहे.


ऑगस्टमध्ये चार सार्वजनिक सुट्ट्या
चालू ऑगस्ट महिन्यात शाळांना चार सार्वजनिक सुट्ट्या असतील. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन व पारशी दिन, १७ ऑगस्टला नागपंचमी, २६ ऑगस्टला ईद-ए-मिलाद आणि २८ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी राहणार आहे. याशिवाय महिन्यातील पाच रविवारही शाळा बंद राहतील.


वर्षभरात ७६ सार्वजनिक सुट्ट्या
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात एकूण ७६ सार्वजनिक सुट्ट्या असतील. यामध्ये मुख्याध्यापकांच्या अधिकारातील एका सुट्टीचाही समावेश आहे. तसेच वर्षातील ५२ रविवार शाळांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षातील एकूण २३७ कामकाजाच्या दिवसांमध्ये अध्यापनासोबतच परीक्षांचे दिवसही समाविष्ट असतील.


अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या अखेरीस
यंदा मतदार यादी पुनरीक्षण, जनगणना आणि ग्रामपंचायत निवडणुकीसारख्या विविध प्रशासकीय कामांमुळे शिक्षकांना अध्यापनासाठी तुलनेने कमी दिवस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलनंतर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षांचा निकाल १ मे रोजी जाहीर केला जाणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी १४ जूनपर्यंत राहणार आहे.


२०२६-२७ मधील प्रमुख सार्वजनिक सुट्ट्या
ऑगस्ट : १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन/पारशी दिन,

१७ ऑगस्ट – नागपंचमी, २६ ऑगस्ट – ईद-ए-मिलाद,

२८ ऑगस्ट – रक्षाबंधन.

सप्टेंबर : १४ सप्टेंबर – गणेश चतुर्थी,

१८ सप्टेंबर – गौरी पूजन,

२५ सप्टेंबर – अनंत चतुर्दशी.


ऑक्टोबर : २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती,

११ ऑक्टोबर – घटस्थापना,

२० ऑक्टोबर – दसरा.
नोव्हेंबर : ५ ते १७ नोव्हेंबर – दिवाळी सुट्टी,

२४ नोव्हेंबर – गुरुनानक जयंती.


डिसेंबर : २५ डिसेंबर – नाताळ.


जानेवारी : ७ जानेवारी – वेळ अमावस्या,

१४ जानेवारी – भोगी,

१५ जानेवारी – मकरसंक्रांत,

२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन.


फेब्रुवारी : १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

मार्च : ६ मार्च – महाशिवरात्री,

१० मार्च – रमजान ईद,

२२ मार्च – धुलिवंदन,

२६ मार्च – गुड फ्रायडे,

२७ मार्च – रंगपंचमी.


एप्रिल : ७ एप्रिल – गुढीपाडवा,

१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,

१५ एप्रिल – श्रीराम नवमी,

१८ एप्रिल – महावीर जयंती.


मे : १ मे – महाराष्ट्र दिन.
अशाप्रकारे, यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या ११ दिवसांच्या सुट्टीसह विविध सण आणि राष्ट्रीय दिनांच्या निमित्ताने वर्षभरात अनेक सुट्ट्या मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!