रावेर तालुक्यातील खिर्डी येथे साजरे केले “गोमातेचे डोहाळे”
बलवाड़ी. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | रावेर तालुक्यातील खिर्डी येथे एक अनोखा उपक्रम संपन्न झाला. यामधे गोमातेचे डोहाळे साजरे करण्यात आले. हिंदु संस्कृती मधे गायीला माते समान मानले जाते .आणि रिती परंपरे नुसार जसे एखाद्या गरोदर मातेसाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो.
त्याच प्रकारे खिर्डी येथे गिरीश भारंबे आणि माधुरी भारंबे यांच्या कल्पनेतून त्यांच्या येथील गोमातेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. व समाजापुढे प्राणिमात्रांप्रती असलेल्या आपुलकीचा आदर्श निर्माण केला. गोमातेच्या या डोहाळे जेवण कार्यक्रम प्रसंगी परिसरातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे रावेर यावल परिसरासह जिल्ह्यात मोठे कौतुक केले जात आहे.
हिंदु धर्मात गाईला” गोमाता” मानून देवीचा दर्जा दिला जातो. पौराणिक मान्यतेनुसार गाई मध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो.ज्यामुळे तिची सेवा केल्याने सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते . गोमातेच्या सेवेने घरातील वास्तू दोष दूर होतात आणि देवी-देवतांची कृपा राहते. गाईच्या शरीराला स्पर्श केल्याने दरिद्रय दूर होते असे मानले जाते, असे गोमातेचे विशेष महत्व या फेसबुक पोस्टमध्ये स्वामींनी सांगितले आहे. तसेच पंचगव्य (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण) पवित्र आणि आरोग्यदायी मानले जाते.
