भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगावात ‘एम.डी.’ या घातक ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव पोलिसांनी एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, एमडी ड्रग्जसह कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अमली पदार्थ तस्करांविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. ४ जून २०२६ रोजी मध्यरात्री १:०० वाजता ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अजिंठा चौफुली परिसरातील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पोलिसांनी सापळा रचला होता.

पोलिसांच्या तपासात पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारमधून ‘एम.डी.'(Mephedrone) या घातक ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समोर आले . पोलिसांनी ड्रग्ज, कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फॉरेन्सिक युनिटने घटनास्थळीच पावडरची प्राथमिक चाचणी करून ते ‘एम.डी.’ ड्रग्ज असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रईस हारुन देशमुख (वय २७, रा. एमआयडीसी पोलीस कॉलनी, जळगाव) तौसिफ सैय्यद आरिफ (वय २१, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) कृणाल ऊर्फ लकी रमेश पाटील (वय ३०, रा. देविदास कॉलनी, जळगाव) या ३ संशयित आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

पुढील तपासस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. पोलीस आता हे ड्रग्ज कोठून आणले गेले आणि जळगाव शहरात ते कोणाला विकले जाणार होते, या आंतरशाखीय रॅकेटचा कसून तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!