SSC HSC Exam Timetable : दहावी बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; “या” तारखे पासून सुरू होणार परीक्षा
पुणे.मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकbशिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी दि.17 सप्टेंबरला जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल तर दहावीच्या परीक्षेसाठी 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. परंतु यंदा एक महिना उशिरा सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आह
बारावीचे वेळापत्रक
प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: बुधवार, 20 जानेवारी 2027 ते शनिवार 6 फेब्रुवारी 2027
लेखी परीक्षा: सोमवार, 8 फेब्रुवारी ते मंगळवार 16 मार्च 2027
दहावीचे वेळापत्रक
प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: गुरुवार, 28 जानेवारी ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027
लेखी परीक्षा: सोमवार, 15 फेब्रुवारी ते गुरुवार, 11 मार्च 2027
बोर्डाने परीक्षांच्या तारखा वेळेत जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

