भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

धोंड्याचा महिना पडला महागात ! जावयाला देण्यासाठी सोन्याची अंगठी लपवून ठेवलेला धोंडाच मांजरीने खाल्ला….काय झालं पुढे …..

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | धोंड्याचा महिना (अधिकमास) हा हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणारा अतिरिक्त महिना आहे. या महिन्याला मोठे धार्मिक महत्व आहे . महाराष्ट्रात या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ किंवा गमतीने ‘धोंड्याचा महिना’ म्हणतात. या महिन्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे जावयाचा सत्कार केला जातो. या महिन्यात सासरच्या लोकांकडून जावयाचा विशेष पाहुणचार आणि सन्मान केला जातो. जावयाला भगवान विष्णूचे रूप मानून त्याचा गौरव केला जातो. जावयाला ३३ च्या पटीत (उदा. ३३ अनारसे, ३३ धोंडे किंवा बत्तासे) वाण देण्याची पद्धत आहे. ‘धोंडे’ हा पुरण किंवा गोड सार भरून उकडलेला किंवा तळलेला पदार्थ असतो.

सोन्याची अंगठी लपवलेला धोंडच मांजरीने खाल्ला…….. असाच एक ठिकाणी धोंडे जेवणासाठी आलेल्या जावयाला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्याचा सासरच्यांचा बेत एका मांजरीमुळे फसला. झाले असे की, अंगठी लपवून ठेवलेला धोंडा घरात आलेल्या मांजरीने गिळल्याने जावयाची सोन्याऐवजी कपड्यांच्या आहेरावरच बोळवण करावी लागली.

घडली अशी घटना की, माजलगाव ( जिल्हा – बीड) जवळील एका वस्तीवर ४ जून रोजी सासू बाईनी जावयाला सरप्राइज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो इतर धोंड्यांसोबत ठेवला होता. मात्र स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात आलेल्या मांजरीने नेमका तोच धोंडा फस्त केला. हा प्रकार लक्षात येताच त्यामुळे घरच्यांची मोठी धांदल उडाली.

आता सुरू झाली अंगठी मिळविण्यासाठी कसरत
अंगठी परत मिळावी म्हणून मांजरीला चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आले. जसे काही मांजरीलाच धोंड्याला बोलाविले. तिला वेगवेगळे प्रकारचे अन्न खाऊ घालण्यात आले. उद्देश असा की तिच्या विष्ठेद्वारे अंगठी बाहेर पडेल, अशी अपेक्षा असताना तसे झालेच नाही. तसे न झाल्याने शेवटी निराश होऊन मांजरीला पशुवैद्यकाकडे नेण्यात आले. उलटी होण्यासाठी औषधही देण्यात आले; परंतु मांजरीला उलटी झाली नाही उलट त्यात मात्र त्या बिचारीचा जीव गेला. त्यानंतर शेवटी मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!