भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

GBS चा वाढता धोका…तर राज्यातील यात्रांवर निर्बंध?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेकजण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहेत. राज्यभरात जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जीबीएसच्या अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता राज्यातील यात्रा आणि जत्रांवर निर्बंध आणणे बाबत महत्वाचे विधान केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.

राज्यात जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव व धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, “GBS हा आजार जर गर्दीमुळे होत असल्याचं किंवा संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!