भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांचीही टीईटी पात्रता तपासली जाणार

मुंबई.मंडे टु मंडे न्युज || राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांच्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पात्रतेची पडताळणी शिक्षण विभागाकडून केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने सर्व शिक्षकांची टीईटी पात्रता तपासण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

यूडायस अहवालानुसार, राज्यातील विविध व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सात लाखांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. सर्वच शाळांमधील शिक्षकांना टीईटी पात्रता असणे आवश्यक असल्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

त्यामुळे आता खासगी विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची माहिती संकलित करून तिची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी यूडायस प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण संस्था आणि शिक्षकांकडून टीईटी पात्रतेसंदर्भातील माहिती घेतली जाणार आहे.

ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत

खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी या कालावधीत टीईटी पात्रता मिळवणे अपेक्षित आहे.

दरम्यान, टीईटी पात्रतेची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षकांची पात्रता आणि त्यासंबंधीची नोंद अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या या प्रक्रियेमुळे शिक्षकांची टीईटी पात्रता अधिकृत नोंदीत तपासली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!