भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

बोदवड, कुऱ्हा- वढोदा- इस्लामपूर, वरणगाव-तळवेल या उपसा सिंचन योजनांच्या कामाला गती देण्यात यावी – आ.एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | बोदवड, भुसावळ तालुक्यातील शेतीसह बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेती साठी नवसंजीवनी ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनांच्या उर्वरित कामास निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच या योजनांच्या काही तांत्रिक बाबी तसेच इतर परवानग्यांचे प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाकडे अडकले आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ते प्रस्ताव मार्गी लावुन योजनांच्या कामातील अडथळे दूर करून योजनांच्या कामाला गती देण्यात यावे अशी आग्रही मागणी आ एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना केली.


यावेळी ते म्हणाले बोदवड परिसर उपसा सिंचन योजना टप्पा -१ चे काम प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेत समावीष्ठ आहे. सदर योजनेमुळे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रास लाभ होणार आहे. या योजनेचे काम सुमारे ७० % पुर्ण झालेले आहे. या योजनेंतर्गत रायझिंग मेन चे काम मुक्ताईनगर शिवारातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद आहे. तसेच धरणामध्ये येत असलेल्या नाल्याचे वळतीकरण करणे आवश्यक आहे. योजनेस दरवर्षी सुमारे रु. ७०० कोटी इतका निधी मिळाल्यास धरण, उपसा व वितरण प्रणालीची कामे पुढील तीन वर्षात पुर्ण होवु शकतील. सदर कामाला तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून कामास लवकर पूर्ण होईल.


तसेच कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचे काम सुमारे ६० % पुर्ण असुन सदर योजनेमुळे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रास लाभ होणार आहे. सद्यस्थीतीत पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी काम स्थगीत आहे. पर्यावरण विभागाच्या मान्यतेची कार्यवाही अंतिम टण्यात असताना, पर्यावरण कायद्याच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या दि.०७/०७/२०२१ च्या कार्यालयीन ज्ञापन कार्यवाहीवर (SOP) मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १६/०५/२०२५ रोजी स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयात महामंडळाने रिव्हू पिटीशन दाखल केली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने दि.१६/०५/२०२५ चा निर्णय मागे घेण्यात आलेला असुन पुढे सुनावणी घेण्याचे निश्चीत केले आहे. सदर निर्णयानुसार केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागास या प्रकल्पास पर्यावरण मान्यता देणेबाबत विनंती करण्यात आली आहे. त्यास मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली.


त्याचबरोबर भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल परिसर उपसा सिंचन योजना या योजनेस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता – रु. ८६१.११ कोटी ची असुन सद्यस्थितीत ओझरखेडा धरण, उपसा प्रणाली, सांडव्याचे व मुख्य विमोचकाचे काम ९९ % पूर्ण झाले असुन ओझरखेडा धरणामध्ये पाणी साठविण्यात येत आहे. तसेच ओझरखेडा धरणातून १३२५८ हेक्टर लाभक्षेत्रासाठी गुरुत्वीय बंदीस्त वितरण प्रणालीच्या कामाची निविदा कार्यवाही पूर्ण होऊन वितरण प्रणालीचे बांधकाम क्षेत्रीय स्थळी प्रगतीपथावर आहे. वितरण प्रणाली वरील रोड क्रॉसिंगचे काम करण्याची परवानगी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पाणी वापर संस्थेच्या इमारतीसाठी लागणा-या जागेसाठी जि.प. जळगाव कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!