भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात ३५० किलो गोमांसासह दोन जिवंत गोवंश जप्त

यावल.मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील किनगाव येथे गोवंश कत्तलीच्या संशयावरून यावल पोलिसांनी मंगळवार २९ सप्टेंबर रोजी पहाटे कारवाई केली. गोरसिया नगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोन जिवंत गोवंश, सुमारे ३५० किलो कत्तल केलेले गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, वजनकाटा आणि मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेची पोलिसांची कारवाई
मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी गोरसिया नगर परिसरात कारवाई केली. यावेळी अंदाजे १५ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंश आढळून आले. तसेच सुमारे ३५० किलो कत्तल केलेले गोमांस जप्त करण्यात आले. यामध्ये अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे १५० किलो, ३६ हजार रुपये किमतीचे १८० किलो आणि चार हजार रुपये किमतीचे २० किलो गोमांस असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हत्यारे व दुचाकीसह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड, सुरी, तराजू व वजनमापे तसेच गोमांस वाहतूक व विक्रीसाठी वापरली जाणारी हिरो कंपनीची डिलक्स मोटारसायकल (एमएच १९ एपी ३९०९) जप्त केली आहे.

सहा जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी रशीद बशीर कुरेशी (४०, रा. गोरसिया नगर, किनगाव), ईस्माईल बिस्मिल्ला कुरेशी (५५, रा. मालोद), समीर सलीम कुरेशी (२७, रा. किनगाव), ईस्माईल युनूस कुरेशी (२०, रा. किनगाव), इम्तियास खलील कुरेशी (१८, रा. किनगाव) आणि अब्यार इब्राहिम कुरेशी (३५, रा. किनगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार विठ्ठलराव वाढवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!