भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

वंदे मातरम् विधेयक लोकसभेत मंजूर; राष्ट्रीय गीताच्या अवमानास फौजदारी गुन्ह्याचा दर्जा

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज | राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अपमान हा फौजदारी गुन्हा ठरवणारे विधेयक ३० जुलै २०२६ रोजी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकामुळे राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीतासारखाच कायदेशीर दर्जा मिळाला आहे.

राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला समान कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.हे विधेयक राज्यसभेत २९ जुलै २०२६ रोजी आणि लोकसभेत ३० जुलै २०२६ रोजी संमत झाले.

संसदेच्या मान्सून अधिवेशनात महत्त्वाचे मानले जाणारे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर करण्यात आले. या दुरुस्तीमुळे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्याचा जाणूनबुजून अवमान करणे किंवा गायनात हेतुपुरस्सर अडथळा आणणे हे फौजदारी गुन्हा मानले जाणार आहे. विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करत गदारोळ केला.

या विधेयकानुसार दोषी आढळणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सरकारच्या मते, राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’लाही समान कायदेशीर संरक्षण देणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे. लोकसभेतील मंजुरीनंतर विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!