हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ, २२ दरवाजे उघडले, मोठा विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची सतत मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असून, धरणाचे सकाळी १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र सततच्या पाण्याच्या आवक मुळे पुन्हा ४ दरवाजे उघडण्यात आले आता एकूण २२ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्या मुळे पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीला मोठा पूर आला आहे.
२७ जुलै रोजी सकाळ पासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. आज रविवार दि. २७ रोजी दुपारी ३ वाजेपासून ४२६६१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज रविवार २७ दि. रोजीचा धरण विसर्ग असा – सकाळी ५ वाजता १८ दरवाजे १ मीटरने उघडले गेले होते आणि त्यातून ३४३२६ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत होता . त्यानंतर १० वाजता पुन्हा २ दरवाजे उघडण्यात आले. दरवाजांची संख्या २० झाली.त्याचा विसर्ग वाढून ३८१४० क्युसेस झाला. पुन्हा दुपारी ३ वाजता २ दरवाजे उघडण्यात आले. असे एकूण २२ दरवाजे १ मीटर ने उघडण्यात आले. त्याचा ४२६६१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दिनाक २७ जुलै रविवार रोजी पावसाची नोंद (२४ तासात) दुपारी ३ वाजे पर्यंत
टेक्सा – ६७.८ मिमी चिखलदरा –६१.६ मिमी देढतलाई – २१.४ मिमी इतर ठिकाणी एकूण = १९१.२ मिमी, सरासरी = २१.२ मिमी
जलपातळी
वॉटर लेव्हल २१०.६९० मी. जलाशयाची पूर्ण लेव्हल २१४.००० मी. ग्रॉस स्टोरेज २२१.६० मिमी (५७.११ टक्के) लेव्हल स्टोरेज ८८.६० मिमी (३४.७५ टक्के) रेडियल गेट विसर्ग: १२०८ क्युमेक्स (४२६६१ क्युसेक) कॅनॉल डिस्चार्ज २.८३ क्युमेक्स (१०० क्युसेक)

