भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला अटक

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर २० जून शुक्रवार रोजी सकाळी एका अंगणवाडी सेविकेचा गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना समोर आली. सदर महिलेला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावखेडा बु. येथील अंगणवाडी सेविका मीनाक्षी चुडामण चौधरी या शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बसने जळगावला जाण्यासाठी सावदा बसस्थानकात आल्या होत्या. त्या बसमध्ये चढत असताना गर्दीत त्यांच्यामागे उभ्या असलेल्या हसीना जहागीर तडवी (वय ५५, रा. लोणी फुकटपुरा, ता. बुऱ्हाणपूर) हिने गळ्यातील ८ ग्रॅम वजनाचे ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरी केले.

मंगळसूत्र चोरल्याचे मीनाक्षी चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास करत हसीना जहागीर तडवी (वय ५५, रा. लोणी, फुकटपुरा, ता. बुऱ्हाणपूर) या महिलेला अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सावदा बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे अशी काही प्रकरणेही समोर आली असून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!