भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

‘हे मला इथे मारतायं तू लवकर ये….’ विहिरीत मृतदेह आढळल्याने रावेर व मध्यप्रदेश सीमा परिसरात खळबळ

रावेर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मध्यप्रदेश सीमे लगतच्या बहादरपूर येथील विटांचे व्यापारी अशोक प्रजापती यांचा दि. १८ रोजी तालुक्यातील अजनाड शिवारातील एका विहिरीत गंभीर दुखापत असलेला मृतदेह आढळला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक आनंदा प्रजापती (रा. बहादरपूर, ता.जि.बऱ्हाणपूर) यांनी त्यांच्या पुतण्यास नागुरखेडा ता. बऱ्हाणपूर येथील एकाने पैसे घेण्यास बोलावले असल्याचे सांगून ते दि. १८ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घरून निघाले. काही वेळातच ११:५५ वाजता त्यांनी त्यांचा पुतण्या रघुनाथ प्रजापती यांना मोबाईल वरून कॉल करून सांगितले की, ‘हे मला इथे मारतायं तू लवकर ये….’ पूर्ण बोलण्याच्या आतच फोन कट झाला. त्या पार्श्वभूमीवर रघुनाथ प्रजापती, मयताचा मुलगा आणि नातेवाईक मोटारसायकल घेऊन मदतीसाठी निघाले.

त्यांना अजनाड शिवारातील गोपाळ तुकाराम पाटील उर्फ बाळू पाटील यांचे अजनाड शिवारातील नागोई नदीकाठी असलेल्या विहिरीवर मोबाइल व खाली एक चप्पल पडल्याचे आढळून आले. रघुनाथ यांनी रावेर पोलिस स्टेशनला खबर दिली असता, सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, फौजदार घनश्याम तांबे, व सहकारी यांनी घटनास्थळी येत पंचनामा करून विहिरीतून प्रेत काढले. अशोक आनंदा प्रजापती वय ४७ वर्ष. यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत पाहून फिरते न्यायवैद्यकशास्त्र पोलिस पथक पाचारण करून काही नमुने हस्तगत करण्यात आले. त्यानंतर मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!