भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावलसामाजिक

श्री निष्कलंक धाम येथे जागतिक योग दिन : शरीर सुदृढतेसाठी प्रत्येकाने दररोज योगाभ्यास करावा – महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | माणसाच्या जीवनात शारीरिक संपत्ती सर्वोत्कृष्ट असल्याने आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास करावा असे अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी जागतिक योग दिनानिमित्त घेतलेल्या निष्कलंक धाम येथे घेतलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात सांगितले.

प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची जोपासना करावी, पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रदूषण मुक्त व्यवहार करावे, आपल्या घरात किंवा बाहेर योग्य त्या ठिकाणीच कचरा टाकावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. निसर्गरम्य अशा सुंदर वातावरणात असलेले तुलसी हेल्थ केअर सेंटर श्री निष्कलंक धाम वढोदा येथे 21 जून रोजी सकाळी 7:30 वाजता शेकडो विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत योग प्राणायाम विधी करण्यात आल्या. आचार्य सचिन पाटील यांनी योगाच्या वेगवेगळ्या क्रिया, त्याची सविस्तर माहिती, शरीरासाठी त्याची उपयुक्तता व निरोगी जीवनासाठी योगाचा उपयोग या संदर्भात माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!