Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर! माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसवर ड्रोनद्वारे रेकी झाल्याचा आरोप; पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके ||मुक्ताईनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर परिसरातील फार्म हाऊसवर ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याचा आरोप खुद्द खडसे यांनी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


माजी मंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच अशा प्रकारची संशयास्पद घटना घडल्याचा आरोप समोर येत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


या घटनेमुळे मुक्ताईनगरातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेची कार्यक्षमता, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


पोलीस प्रशासनाचे अपयश की सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी?
ड्रोनद्वारे रेकी झाल्याचा आरोप नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, यामागे कोणाचा सहभाग आहे का आणि संबंधित प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली, याबाबत सखोल तपास होणे आवश्यक आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ शकते. मुक्ताईनगरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलीस प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, या प्रकरणातील सत्य समोर येऊन नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर होणे गरजेचे आहे.


माजी मंत्र्यांच्या फार्म हाऊसवरील कथित ड्रोन रेकी प्रकरणामुळे मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेची कसोटी लागली आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!