भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

प्लास्टिकच्या नोटा कधी येणार बाजारात? RBI ने जाहीर केली तारीख, मात्र जुन्या नोटांचं काय?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले आहे की, सर्व काही नियोजनानुसार झाल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला (२०२७-२८) १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक (पॉलिमर) नोटा चलनात आणण्याचे लक्ष्य आहे. सध्या या नोटांच्या चाचणीचे काम सुरू आहे.सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटा बाजारात येणार असून केंद्र सरकारने फिल्ड ट्रायलसाठी प्रत्येकी १ अब्ज अशा एकूण २ अब्ज नोटा छापण्यास मंजुरी दिली आहे.

कागदी नोटांचे काय?
कागदी नोटा पूर्णपणे बंद होणार नाहीत; दोन्ही प्रकारच्या नोटा एकाच वेळी चलनात राहतील. या नोटा ओल्या होणार नाहीत, मळणार नाहीत आणि सहजासहजी फाटणार नाहीत.

पॉलिमर नोटा कशा असतात?
पॉलिमर नोटा या विशेष प्रकारच्या प्लास्टिकसदृश कृत्रिम (सिंथेटिक) पदार्थापासून तयार केल्या जातात. मजबूत आणि लवचिक प्लास्टिक फिल्मवर या नोटांची छपाई केली जाते. त्यामुळे त्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असतात आणि सहज फाटत किंवा खराब होत नाहीत. आगामी काळात सरकारकडून २ (दोन) अब्ज प्लास्टिक नोटा छापल्या जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या नोटांचा वापर टप्प्याटप्प्याने देशभरात वाढवला जाणार आहे.

भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार असल्याची चर्चा मागील दिवसांपासून सुरु आहे. प्लास्टिकच्या नोटांची छपाई करण्याच्या अनुषंगाने तयारी देखील सुरु आहे. आता प्रत्यक्षात भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात कधी येणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. RBI या नोटा कधी चलनात येणार या अनुषंगाने संभाव्या तारीख जाहीर केली आहे. भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात आल्यानंतर जुन्या नोटांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

१० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या चाचणीला मंजुरी देताना सरकारने स्पष्ट केले आहे की, याचा सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांवर कोणताही परिणाम होणार नाही. कागदी नोटा बंद केल्या जाणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर त्या पॉलिमर नोटांसोबतच अस्तित्वात राहतील. सरकारने म्हटले आहे की, सध्या कागदी चलनाच्या जागी पूर्णपणे पॉलिमर नोटा आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

पॉलिमर नोटांचे आयुष्य सध्याच्या कागदी नोटांपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, प्लास्टिक नोटांसंबंधीचा हा प्रकल्प सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. या नोटा नियमितपणे जारी झाल्यानंतर डिजिटल पेमेंटवर होणाऱ्या परिणामाचे देखील मूल्यांकन केले जाणार आहे.

२०२८ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पॉलिमर नोटा किंवा प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तयारी सुरू असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले. एमपीसीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पॉलिमर नोटांसाठी एक प्रायोगिक कार्यक्रम सुरू आहे. या नोटा बाजारात आणण्यापूर्वी त्यांची चाचणी आणि मूल्यांकन केले जाणार असल्याचेही गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!