भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनशिराबादभुसावळ

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने लांबविलेला सोन्याचा ऐवज हस्तगत; दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद

नशिराबाद. मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचा ऐवज लांबविणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन भुसावळ तालुका व बोदवड पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांतील एकूण ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच बोदवड पोलीस ठाणे गु.र.नं. १२८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) या गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८ वर्षे, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ, जि. जळगाव) याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ अकोला येथे रवाना झाले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३२ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

तसेच बोदवड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत केलेल्या चौकशीत आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार सोन्याची रिंग, वजन अंदाजे १५.०८ ग्रॅम, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे सदर कारवाईत एकूण ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व परि. पो. उप. अधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वर नमूद आरोपीस ताब्यात घेता त्याने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोहेकॉ. गोपाल गव्हाळे, पोना. विकास सातदिवे, पोको. प्रशांत परदेशी, पोको. राहुल वानखेडे, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चापोको. रिजवान शेख तसेच तांत्रिक मदत पोको. गौरव पाटील व पोको. मिलिंद जाधव यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली.अटक आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ. विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!