छत्रपती संभाजीनगरात स्केटिंगचा विक्रम; १२० स्केटर्सचे ७९ मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग, भुसावळच्या तीर्थराज पाटीलचा विशेष सन्मान,‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमाची नोंद
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत देशभक्ती, क्रीडाजिद्द आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. १५ ऑगस्ट रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे तब्बल १२० स्केटर्सनी सलग ७९ मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग करून आंतरराष्ट्रीय विक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. या विक्रमाची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये करण्यात आली.
रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या मान्यतेने तसेच रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि अंबे स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा भव्य विक्रम आयोजित करण्यात आला.
या ऐतिहासिक विक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय क्रीडा उपसंचालक मा. श्री. शेखरजी पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. मुकुंदजी वाडकर यांच्या हस्ते झाले.
तिरंग्याच्या साक्षीने, १२० स्केटर्सच्या जिद्दीने आणि साडेतीनशे ते चारशे पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेला हा विक्रम छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रातील एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण ठरला.
या कार्यक्रमात आठ वर्षे वयाच्या गटात सर्वोत्कृष्ट स्केटर म्हणून भुसावळ येथील एन के नारखेडे स्कूल व सिल्व्हर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चा विद्यार्थी तिर्थराज मंगेश पाटील चा विभागीय क्रीडा उपसंचालक मा. श्री. शेखरजी पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. मुकुंदजी वाडकर यांच्या हस्ते सत्कार व अभिनंदन करण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव भिकन अंबे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफिसियल राधिका अंबे, गणेश बनसोडे, प्रियंका राजपूत तसेच साई अंबे, तेजस सोनाळकर, विवेक मालोदे आणि सुदीप तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

