थोरगव्हाण जि.प. शाळेत आंतरराष्ट्रीय योग दीन उत्साहात
कुंभारखेडा,ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज. प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूतांनी थोरगव्हाण ता रावेर येथील जिल्हा परिषद शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, फायदे आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी माहिती देण्यात आली. विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना देखील सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक कृषिदूत दिनेश दिलीप महाजन, जयेश विठोबा माळी,पवन अरुण पाटील, प्रणव शंकर पाटील, शिवराज सदाशिव शेवाळे, यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा तायडे मॅडम, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

