भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रराष्ट्रीय

तुम्ही खाताय ते “तूप” गावरान की जनावरांची चरबी! प्राण्यांच्या चरबी पासून बनवलं जातयं गावरान तूप….काय आहे प्रकार..

मंडे टु मंडे न्युज | बाजारात स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या ‘गावरान तूप’ किंवा ‘देशी तूप’ मध्ये दुधाच्या तुपाऐवजी जनावरांची चरबी, हाडे आणि कातडी उकळून मिळवलेल्या घातक चरबीची (Animal Fat) भेसळ असण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.

हा भयानक प्रकार मध्य प्रदेशातील खांडवा व इतर काही भागांत आढळून आला. अशा अवैध कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या, जिथे चक्क गाई-म्हशींची चरबी उकळून त्यापासून भेसळयुक्त तूप तयार केले जात होते। हे तूप दिसायला आणि चवीला हुबेहूब अस्सल तुपासारखे पण ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असणारे आढळून आले.

खांडवा शहरातील इमिलीपुरा भागात अनेक दिवसांपासून दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी तक्रार दिली. मात्र वारंवार तक्रार देऊनही याप्रकरणात प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही. अखेर संतापलेल्या नागरिकांनी रेटा लावला आणि शहर दंडाधिकारी, पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने ‘बेगम पार्क’ परिसरातील तूप बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली.

या धाडीत तब्बल १३८० किलो जनावरांची चरबी, २७०० लिटर चरबीचं तेल आणि ८ क्विंटल हाडं आणि चामडं जप्त करण्यात आलं. २०१५ पासून म्हणजे तब्बल ११ वर्षांपासून हा कारखाना या भागात असूनही प्रशासनाला याची कुठलीच माहिती नव्हती. या कारखान्यात तूपसदृश्य पदार्भ तयार करण्यासाठी १३८ जनावरांची कत्तल केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!