भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल मध्ये गांजा तस्करांवर मोठी कारवाई, गांजा सह होंडा सिटी कार जप्त

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |किनगाव-चुंचाळे रोडवर यावल पोलिसांनी कारवाई करत १ किलो ७९ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा ओला गांजा आणि ५ किलो २५४ ग्रॅम वजनाचा सुगंधी गांजा, असा एकूण सुमारे ६ किलो ३३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ६३ हजार रुपये असून सोबत MH -०१ BB १४०७ क्रमांकाची होंडा सिटी कार देखील जप्त करण्यात आली असून, तिची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. अशा प्रकारे, पोलिसांनी एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

रोनक रुबाब तडवी (रा. कुसुंबा, ता. रावेर,जिल्हा -जळगाव) हा यावल परिसरात आर्थिक फायद्यासाठी अमली पदार्थ चोरट्या मार्गाने तस्करी करून विक्री करीत असल्याची माहिती यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती.त्या नुसार सापळा रचून रौनक रुबाब  तडवी याला ताब्यात घेण्यात आले. याच्या कडून हा गांजा आणि वाहन हस्तगत करण्यात आले.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून . पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!