अल्पवयीन तरुणीशी विवाह ; अत्याचारातून तरुणी गर्भवती, पती विरुद्ध पोक्सोसह बाल विवाहाचा गुन्हा
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || अल्पवयीन तरुणीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह संबंधित व्यक्तींविरुद्ध पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती धानवड, ता. जि. जळगाव येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, तिचा विवाह भूषण मोरे याच्यासोबत करण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी विवाह करण्यात आल्याचा आरोप आहे.
विवाहानंतर पती-पत्नीप्रमाणे राहत असताना तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारातून मुलगी गर्भवती झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ६४ (२) (एम), पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ६ व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूर पोलीस ठाणे, जि. जालना येथून प्राप्त झालेल्या माहितीनंतर संबंधित तक्रारीच्या आधारे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.


