भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडारावेरशैक्षणिक

रावेर तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहात

कुंभारखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्यूज. प्रा.योगेश कोष्टी || तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन एन.जी.पाटील माध्यमिक विद्यालय उदळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांमधील मुलींच्या संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक मान.श्री.वाय.एल.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी शिस्त, संघभावना, क्रीडाभावना आणि उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. विविध संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांमुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी वेग, चपळता, अचूक निर्णयक्षमता आणि सांघिक कौशल्याचा प्रभावी वापर केला. पंच, क्रीडा शिक्षक आणि आयोजकांनी स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.विदयालयाचे क्रीडा शिक्षक श्री भरत जंगले सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अंतिम विजेता संघ वयोगट 14/19 सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपुर तर 17 वर्ष वयोगट अंतिम विजेते अ.भा.पाटील विद्यालय खिडीऀ

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद, पंच तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!