भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण ; न्हावीत शांततापूर्ण तणाव

न्हावी, ता. यावल.मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील न्हावी गावात गणपती मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील न्हावी गावातील चौधरी नामक व्यक्तीची १६ वर्षीय मुलगी गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा येथे उभी होती. त्यावेळी चेतन ललित झोपे (वय ३०) याने कोणतेही स्पष्ट कारण नसताना तिच्याशी वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत मुलगी बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने भुसावळ येथील लोकेश नेहते यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेनंतर चेतन झोपे यालाही जमावाकडून मार लागल्याची माहिती आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. त्यानंतर मिरवणूक शांततेत मार्गस्थ करण्यात आली. संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. घटनेबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे मारहाणीचे नेमके कारण, घटनेतील वस्तुस्थिती आणि पुढील पोलिस कारवाईबाबत अधिकृत नोंदीनंतरच स्पष्टता येणार आहे. मात्र दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण वातावरणत गणपती मिरवणूक पार पडली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!