भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात संपन्न

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज || दि. २४ सप्टेंबर २०२६ : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जे. पी. नेहेते (माजी रासेयो विभागीय समन्वयक) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, उद्देश व सामाजिक कार्यातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वयंसेवकांनी समाजाशी जोडले जाऊन सेवाभावाने कार्य करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. उमरीवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, रासेयो यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. जे. पी. नेहेते, डॉ. एस. एन. वैष्णव, डॉ. एस. पी. उमरीवाड, डॉ. एस. एस. साळुंके, डॉ. व्ही. एन. रामटेके (प्रमुख कार्यक्रम अधिकारी, रासेयो), प्रा. प्रदीप तायडे आणि श्री. श्रेयस पाटील यांनी सहकार्य केले.


या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना एककातील विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!