यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशीकांत गवई कार्यालयात अनियमितपणे उपस्थित राहतात. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार
यावल.मंडे टु मंडे न्युज | दि.११ : यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई नगरपरिषद कार्यालयात अनियमितपणे उपस्थित राहत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे रावेर लोकसभा क्षेत्र शिवसेना ( शिंदे ) जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी दाखल केल्याने जिल्हाधिकारी कारवाई काय करणार याकडे शिवसेना शिंदे गटासह यावल शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की यावल शहरातील रहिवासी /तक्रारदार असून यावल नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे.यावल न.प. मुख्याधिकारी हे नगरपरिषदेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख अधिकारी असून कार्यालयीन कामकाज,कर्मचारी नियंत्रण,अनेक नागरिकांच्या तक्रारी,शासकीय पत्रव्यवहार, विविध विकासकामे,आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव,नगरपरिषद सभागृहातील ठरावांची पुढील
अंगलबजावणी तसेच शासन व वरिष्ठ कार्यालयांशी समन्वय यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते मात्र मुख्याधिकारी हे कार्यालयीन वेळेत अनियमितपणे नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध राहत असल्यामुळे नागरिकांना व नगरपरिषद प्रशासनाला अनेक अडचणी निर्माण होत असल्याची गंभीर तक्रार करीत आहे.
सदर बाबीमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.
कार्यालयीन उपस्थितीबाबत चौकशी आवश्यक असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडून
मुख्याधिकारी यांच्या कार्यालयीन अनुपस्थितीबाबत कोणतीही पूर्वकल्पना सक्षम प्राधिकार्याची पूर्वपरवानगी नसताना ते कार्यालयात अनुपस्थित राहतात. याची सखोल वस्तुनिष्ट तपासणी अचानक भेट देऊन होणे
आवश्यक आहे.
त्यासाठी बायोमेट्रिक हजेरी रजा, दौरे, इत्यादी,अनुपस्थितीमुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांची चौकशी,संबंधित महत्त्वाच्या अभिलेखांची चौकशी, नागरिकांच्या भेटी तक्रारीच्या नोंदी, चौकशी दरम्यान किंवा चौकशी केली जाणार असल्याने संबंधित अभिलेख हजेरी नोंदी सुरक्षित ठेवण्याचे निर्देश यावल न.प.ला देण्याबाबत,नि: पक्षपणे चौकशी करून मुख्याधिकारी यांची बदली किंवा स्थानांतरणाचा प्रस्ताव सक्षम प्राधिकार्याकडे देण्याची तसेच चौकशी दरम्यान दोषी,कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्यास शिस्तभंगाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तत्काळ चौकशी करून करण्याची मागणी रावेर लोकसभा क्षेत्र शिवसेना ( शिंदे ) जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी केल्याने नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


